Join us
Daily Top 2Weekly Top 5

थलायवा रजनीकांत यांनी घेतला कोव्हिड व्हॅक्सिनचा दुसरा डोस, लेक सौंदर्या फोटो शेअर करत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:19 IST

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. दररोज हजारो लोकांना कोरोना होतोय. हे टाळण्यासाठी, चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींनी ही व्हॅक्सिन घेण्याचे आवाहन लोकांना करित आहेत. तसेच व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करतायेत.  तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरवरुन ही माहिती चाहत्यांना दिली. रजनीकांत यांचा व्हॅक्सिन घेतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. आपल्या थलैवानी व्हॅक्सिन घेतले आहे. आपण एकत्र मिळून कोरोना व्हायरस विरोधात लढू या अशा आशायाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.  यासोबतचा घराची रहा, मास्क लावा असे आवाहनही तिने लोकांना केले आहे. सौंदर्याचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना विरोधात लढतो आहे. 

साऊथमध्ये त्यांची  इमेज  एखाद्या ‘भगवान’ किंवा सुपरमॅनसारखी त्यामुळे त्यांचे अनुकरण लाखो चाहते करुन व्हॅक्सिन घेतली अशी आशा आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखे पुजले रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात.

टॅग्स :रजनीकांत