बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी लव्हर बॉय इमेजमधून चित्रपट रसिकांना वेड लावलं. रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच विरहगाथा त्यांनी कधी हसवत तर कधी डोळ्यात आसवं आणत निभावल्या आणि इतिहास रचला. त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींशी राजेश खन्ना यांची सिनेमात जोडी जमली. त्याकाळी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये राजेश खन्ना यांचं नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडलं गेलं. पण असे म्हटले जाते की, डिम्पल कपाडियासोबत लग्न केल्यानंतर राजेश खन्ना टीना मुनिमबरोबर रिलेशनशिपमध्ये आले होते.
सौतन सिनेमाच्यावेळी राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांच्यात जवळीक वाढू लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. टीनावर राजेश मनापासून प्रेम करायचे. ते एकत्र राहू लागले. राजेश खन्ना यांनीदेखील हे नाते कधीच लपवले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की, मी टीनावर एवढे प्रेम करतो की मी तिचा दात घासण्यासाठी टुथब्रश पण वापरतो. यानंतर त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा देखील झाली होती.