Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाइमलाइटपासून दूर आहे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची दुसरी लेक रिंकी, आता राहते परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 16:57 IST

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची दुसरी मुलगी रिंकी आता लाइमलाइटपासून दूर परदेशात राहते आहे. तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे पण लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.

अभिनेत्री डिंपल कपाडिया वेबसीरिज तांडवमुळे चर्चेत आली आहे. वादग्रस्त ठरलेल्या या वेबसीरिजमधील तिच्या कामाचे खूप कौतूक केले जात आहे. डिंपल कपाडियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर जवळपास वयाच्या सोळाव्या वर्षात राजेश खन्नासोबत लग्न केले. १७व्या वर्षात ट्विंकल खन्नाला जन्म दिला. त्यानंतर दुसरी मुलगी रिंकीचा जन्म झाला. मात्र रिंकीच्या जन्मानंतर राकेश खन्ना अजिबात खूश नव्हते.

राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास ‘राजेश खन्ना: कुछ तो लोग कहेंगे’मध्ये यासिर उस्मानने लिहिले की, राजेश खन्ना यांना आशा होती की त्यांना दुसरा मुलगा होईल. मात्र २७ जुलै १९७७ साली रिंकीचा जन्म झाला. चित्रपट पत्रकार इंग्रिड अलबकर्कचा संदर्भ देत राकेश खन्ना यांच्या जीवन प्रवासात लिहिले की, राजेश खन्ना यांनी कित्येक महिन्यांपर्यंत दुसऱ्या मुलीकडे पाहिलेदेखील नव्हते. कुटुंब तिचे नामकरण करायलाही विसरले होते.

राजेश खन्ना यांचे करियरदेखील त्या काळात तितके खास चालत नव्हते आणि मुलगा होईल अशी आशा असताना मुलगी झाली, त्यामुळे ते नाराज होते. मात्र नंतर रिंकी जशी मोठी होऊ लागली आणि तिच्या निरागस मस्तीने राजेश खन्ना यांचे मन जिंकले. त्यानंतर त्यांचे दोन्ही मुलींवर खूप प्रेम होते.

रिंकी खन्नाने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले पण तिला तितके यश मिळाले नाही. तिने १९९९ साली प्यार में कभी कभी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर तिने मुझे कुछ कहना है, जिस देश में गंगा रहता है यासारख्या सिनेमात काम केले आहे. तिने काही तमीळ चित्रपटातही काम केले आहे. आता रिंकी लाइमलाइटपासून दूर राहते. सध्या ती पती आणि एका मुलगीसोबत ब्रिटेनमध्ये राहते. 

रिंकीने ८ फेब्रुवारी, २००३ साली बिझनेसमन समीर सरणसोबत लग्न केले. लग्नानंतर रिंकीने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला आणि परदेशात स्थायिक झाली. तिला एक मुलगी आहे जिचा जन्म १९ ऑक्टोबर, २००४ला झाला आहे.

टॅग्स :राजेश खन्नाडिम्पल कपाडियाट्विंकल खन्ना