Join us
Daily Top 2Weekly Top 5

Krishna Kapoor Death:राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:22 IST

बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत दीर्घआजाराने निधन झाले.

बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत दीर्घआजाराने निधन झाले. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

कृष्णा यांना गत आॅगस्टमध्ये मुंबईस्थित एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली होती. कृष्णा यांना पाच मुले. यात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा व रितू यांचा समावेश आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर , रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत. ८७ वर्षांच्या वयातही कृष्णा ब-याच अ‍ॅक्टिव्ह होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले़ यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.  बॉलिवूडच्या अनेकांनी कृष्णा राज कपूर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रवीना टंडन, अनुपम खेर यांनी ट्विटरवर कृष्णा राज कपूर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :राज कपूर