Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे थांबले ‘रात्रीस खेळ चाले २’चे शूटींग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 15:02 IST

गेल्या काही दिवसांत ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. पण तूर्तास या मालिकेचे चित्रीकरण खोळंबले आहे. होय, या मालिकेला पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

ठळक मुद्दे सावंतवाडीमध्ये या मालिकेचा सेट आहे. सेटवर चहूबाजूंनी पाणीच पाणी साचले आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच दुसºया पर्वावरदेखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचे बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांना जाते. गेल्या काही दिवसांत ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. पण तूर्तास या मालिकेचे चित्रीकरण खोळंबले आहे. होय, या मालिकेला पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालिकांनाही पावसाचा फटका बसतोय.

तूर्तास पावसामुळे ‘रात्रीस खेळ चाले २’ चे शूटींग थांबवण्यात आले आहे. सावंतवाडीमध्ये या मालिकेचा सेट आहे. सेटवर चहूबाजूंनी पाणीच पाणी साचले आहे. अशास्थितीत शूटींग शक्य नसल्याने मेकर्सनी अखेर शूटींग थांबवण्याचा निर्णय घेतला.

 नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि, छायाचे राजग्या बरोबरचे प्रेमप्रकरण सगळ्यांसमोर उघड होते म्हणून अण्णा तिच्यावर जबरदस्ती करून तिला खोलीत डांबून ठेवतात. अशाच परिस्तिथीत एक स्थळ तिला बघायला येत आणि ते दोघेही एकमेकांना होकार देतात. राजग्याचा जीव वाचावा म्हणून नाईलाजाने छाया लग्नास होकार देते. एक मोठं भाऊ म्हणून माधव गोष्टी नीट करायचे असे ठरवतो पण तसे काही घडत नाही.  छायाचे लग्न झाल्यावर तिच्या नव-याचा एकाएकी मृत्यू हातो. दुसरीकडे तिच्या प्रियकराचा ही खून होतो.   

टॅग्स :रात्रीस खेळ चाले