Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' मालिकेत दिसणार राहुल बोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:00 IST

‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘मुस्कान’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.

ठळक मुद्दे ‘मुस्कान’ मालिकेत लवकरच एक नवी एंट्री होणार आहेराहुल बोस यात कॅमिओ करणार आहे

‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘मुस्कान’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत लवकरच एक नवी एंट्री होणार आहे. या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.  स्टार भारतवरील मुस्कानमध्ये आता लोकप्रिय चेहरा राहुल बोस दिसणार आहे.  शरद मल्होत्रा आणि येशा रूघानीनंतर आता चमेली आणि दिल धडकने दो अशा चित्रपटांमधून काम केलेला बॉलीवूड अभिनेता राहुल बोस मुस्कानमध्ये कॅमिओ भूमिकेत दिसून येणार आहे.

चमेलीमध्ये दिसून आलेला राहुल बोसचा मुस्कानच्या कथानकाशी कनेक्ट आहे. ह्या शोमधील त्याच्या विशेष उपस्थितीमुळे ह्या शोमध्ये मोठे नाट्‌य निर्माण होईल. राहुल ह्या मालिकेत रौनक ऊर्फ शरद मल्होत्राच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनुसार निर्माते राहुल बोससोबत चर्चा सुरू असून राहुल लवकरच उर्वरित टीमसोबत चित्रीकरणाला सुरूवात करेल. 

काही दिवसांपूर्वी या मालिकेने 14 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यानुसार शरद मल्होत्रा रौनकच्या रूपात आणि येशा रूघानी मुस्कानच्या रूपात दिसून येईल.ही मालिका आहे आरती आणि तिची मुलगी मुस्कान यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल आहे. मुस्कानला तर तिच्या आयुष्यात काही चांगले घडण्याची अपेक्षाच नाहीये, त्यामुळे आता रौनकच्या प्रवेशामुळे ह्या मालिकेत एक वेगळेच वळण येईल। काय हा मुस्कानसाठी आशेचा एक नवीन किरण असेल. 

टॅग्स :राहुल बोस