Join us

पंजाबी गाण्यावर परिणीतीच्या झक्कास डान्स मूव्ह्स, तिच्याकडे पाहातच राहिले राघव चढ्ढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:25 IST

परिणीती आणि राघव यांच्या  प्री-वेडिंग फंक्शन्स सुरुवात झाली. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी लगीनघाई सुरू आहे. परिणीती आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. परिणीती आणि राघव यांच्या  प्री-वेडिंग फंक्शन्स सुरुवात झाली आहे. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये परिणीती आणि राघव त्यांच्या डान्स मूव्ह पाहायाला मिळत आहेत. 

परिणीती आणि राघव  'तेरा यार बोल्डा' या पंजाबी गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा सिल्व्हर कलरच्या चमकदार कपड्यात अगदी सुंदर दिसत आहे. परिणीतीच्या डान्स मूव्ह्स आणि एक्सप्रेशन्स पाहून राघव तिच्या स्टाईलवर फिदा झालेत. हा शानदार डान्स व्हिडीओ एका इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.  यापुर्वी राघव-परिणितीचा गुरुद्वारामध्ये आशीर्वाद घेतनाचा व्हिडीओ समोर आला होता. 

परिणीती आणि राघवचे लग्न उदयपूर पॅलेसमध्ये खूप ग्रँड होणार आहे. या कपलच्या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.  यामुळे पूर्ण गोपनियता पाळली जाईल. पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाही व्यवस्थाही करण्यात आली आहे.  तर ३० सप्टेंबरला चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलंय. दोघांची पहिली भेट विदेशात झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. दिल्ली  येथे अत्यंत आलिशान पद्धतीने राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा मे महिन्यात पार पडला होता. या साखरपुड्याला अत्यंत जवळच्या लोकांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यावेळी जबरस्त लूकमध्ये परिणीती आणि राघव हे दिसले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्यातील काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटी