Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये राधिका आणणार शनाया आणि गुरुनाथवर संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 07:15 IST

राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात

ठळक मुद्देगुरूच्या या अशा वागण्यामुळे आईला जबरदस्त धक्का बसला आहेराधिकाच्या डोक्यात काय शिजतंय हे कोणालाच माहिती नाहीये

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.  आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे आणि राधिका गुरुनाथचा डिव्होर्स झाल्याशिवाय हे लग्न अधिकृत देखील ग्राह्य धरलं जाणार नाही हे माहित असून देखील गुरुनाथने अहंकारात हे लग्न केलं. गुरूच्या अशा वागण्यामुळे सर्वच जण हैराण आहेत तसंच राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात. पण गुरूच्या या अशा वागण्यामुळे आईला जबरदस्त धक्का बसला आहे आणि त्यांची मनस्थिती सांभाळण्यासाठी राधिका गुरूला पोलिसांच्या हवाले करणार नाही आहे. राधिका स्वतः गुरूला शिक्षा करणार आहे. राधिकाच्या डोक्यात काय शिजतंय हे कोणालाच माहिती नाहीये पण येत्या भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत कि राधिका अगदी धुमधडाक्यात शनायाला गुरुनाथची बायको म्हणून स्वतःच्या घरी घेऊन येणार आहे. राधिका तिच्या ठसकेबाज नागपुरी अंदाजात शनाया आणि गुरुला धडा शिकवणार आहे. राधिकामुळे गुरु आणि शानयाच्या संसारावर संक्रात येणार इतकं नक्की. राधिका गुरु आणि शनाया कसा धडा शिकवेल हे पाहणं रंजक ठरेल. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोअभिजीत खांडकेकरअनिता दाते