Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेटकरी जोरात! अनुष्का शर्मानंतर राधिका आपटेची घेतली मजा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 19:27 IST

नेटकऱ्यांनी अनुष्काचे फोटो एडिट करून असे काही मीम्स बनवलेत की, लोकांचे हसून हसून पोट दुखले. अनुष्कानंतर आता अभिनेत्री राधिका आपटेवरचे जोक्स आणि मीम्स जोरात आहेत. 

गेल्या आठवड्यात ‘सुईधागा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अनुष्का शर्मा चर्चेत राहिली. ‘सुईधागा’ ट्रेलर प्रसिद्ध झाला आणि या चित्रपटातील अनुष्काच्या लूकवरच्या जोक्स आणि मीम्सचा जणू पूर आला. नेटकऱ्यांनी अनुष्काचे फोटो एडिट करून असे काही मीम्स बनवलेत की, लोकांचे हसून हसून पोट दुखले. अनुष्कानंतर आता अभिनेत्री राधिका आपटेवरचे जोक्स आणि मीम्स जोरात आहेत. नेटफ्लिक्सच्या एकापाठोपाठ एक अशा वेबसीरिजमध्ये राधिका आपटेची वर्णी लागलेली पाहून नेटकरी राधिकाची मजा घेताना दिसत आहेत.

 आधी राधिका नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये दिसली. यानंतर ‘सेक्रेड गेम्स’मध्ये  दिसली. यापाठोपाठ नेटफ्लिक्सच्या ‘घौल’ या वेबसीरिजमध्येही राधिकाची वर्णी लागली.

 नेटफ्लिक्सच्या  प्रत्येक वेबसीरिजमध्ये राधिकाला पाहून नेटक-यांच्या हाती जणू आयते कोलित सापडले आणि त्यांनी यावरून अनेक मीम्स बनवणे सुरु केले.

सध्या सोशल मीडियावर राधिकावरच्या मीम्स आणि जोक्सचा पूर आला आहे. हे जोक्स आणि मीम्स वाचून पुन्हा एकदा तुमचे हसून हसून पोट दुखल्याशिवाय राहणार नाही.

अर्थात राधिकाला यामुळे जराही फरक पडत नाही. नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये मी असणे हा निव्वळ योगायोग आहे. पण यावरून लोकांचे मनोरंजन होत असेल तर होऊ देत, असे अलीकडे ती म्हणाली.

सर्वात आधी ‘लस्ट स्टोरिज’ प्रदर्शित ही सीरिज प्रदर्शित झाली. त्यामागोमाग ‘सेक्रेड गेम्स’ आणि मग त्यानंतर ‘घौल’ ही सीरिज प्रदर्शित झाली. हे सर्व ठरवून करण्यात आलं नव्हतं, कारण ‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफ्लिक्सची ओरिजिनल सीरिज आहे, हे सुरुवातीपासूनच मला ठाऊक होतं. पण, ज्यावेळी ‘लस्ट स्टोरिज’ आणि ‘घौल’ चित्रीत झाल्या तेव्हा मात्र त्या नेटफ्लिक्सच्या सीरिज नव्हत्याच. या सीरिज कुठे आणि कशा प्रकारे प्रदर्शित होणार, हे आम्हालाही ठाऊक नव्हत. पण नेटफ्लिक्सने पुढाकार घेतला आणि गोष्टी पुढे घडत गेल्या. त्यामुळे हा एक निव्वळ योगायोगच होता, असे ती म्हणाली.

 

टॅग्स :राधिका आपटेनेटफ्लिक्स