राधिका आपटे (Radhika apte) ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. चित्रपटांसोबतच लुक्समुळेही ती चर्चेत असते. सध्या चर्चा होतेय ती तिच्या एका ग्लॅमरस फोटोची. राधिकाने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात राधिका अनोख्या अंदाजात दिसतेय. फोटोत ती चक्क रस्त्यावर हात पसरून बसलेली दिसतेय. तिच्या शेजारी बेडकाचा एक स्टॅच्यू आहे आणि या स्टॅच्यूशेजारी बसून राधिकाने बेडकासारखीच पोज दिली आहे. ‘ प्रत्येकजण प्राणी आहे. मी बेडकासारखी दिसतेय...’असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिलेय.
अनेकांना राधिकाचा हा फ्रॉग लूक खूप आवडला आहे. काही जणांनी तिला सुंदर आणि सेक्सी बेडूक म्हटलं आहे. राधिकाने आपण कोणत्या प्राण्यासारखं दिसतो हे सांगितल्यानंतर चाहत्यांनाही तुम्ही कुणासारखे दिसता असा प्रश्न केला आहे. यावर अनेकांनी आम्ही पण तुझ्यासारखेच बेडूक असल्याचं म्हटलं आहे.
झाली ट्रोल