Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राधा प्रेम रंगी रंगली'चे ४०० भाग पूर्ण, राधा-प्रेमच्या आयुष्यात सुखाची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:57 IST

कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, राधाचे तिच्या माणसांवर आणि प्रेमवर असलेले निस्वार्थी प्रेम, तिने घरच्यांसाठी आणि प्रेमासाठी केलेला त्याग, देवयानी – दीपिकाच्या प्रत्येक कारस्थानांना ज्याप्रकारे राधा सामोरी गेली, तिच्या परिवाराला प्रत्येक संकटापासून जसे तिने वाचवले हे सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमामुळेच राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता तब्बल ४०० भागांचा पल्ला गाठला आहे. 

४०० भागांचा पल्ला मालिकेने गाठला याचा आनंद कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. प्रेक्षकांना येत्या भागांमध्ये देखील बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये या वर्षामध्ये बऱ्याच घटना घडल्या, राधा आणि प्रेमच लग्न, त्यांच्या प्रेमाची सुरुवात, राधाचे अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणे, राधाचे प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणे, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न, राधा – प्रेम विरोधात रचलेले कारस्थान, दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसे करण्याचा केलेला प्रयत्न... हे सगळे राधानी मोठ्या धीराने सहन केले. प्रत्येक कठीण प्रसंगाला ती मोठ्या हिमतीने सामोरी गेली. राधा दीपिकाच्या विरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिली. आता मात्र पुन्हा राधा आणि प्रेमच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागणार आहे. राधा गरोदर असल्याची गोड बातमी तिने प्रेमला आणि घरच्यांना सांगितली असून सगळेच खूप आनंदी आहेत.

या दोघांच्या सुखात पुन्हा दीपिका मिठाचा खडा तर टाकणार नाही ना ?  दीपिका आता कोणती खेळी खेळणार ? त्याला राधा आणि प्रेम कसे उत्तर देणार ?  हे बघणे रंजक असणार आहे.तेव्हा हे सगळे जाणून घेण्यासाठी नक्की बघा राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.०० वाजता फक्त कलर्स मराठी. 

टॅग्स :राधा प्रेम रंगी रंगलीकलर्स मराठी