Join us

"मुलींचा पाठलाग करण्यात काहीच चुकीचं नव्हतं, कारण...", मॅडीच्या विधानाची चर्चा, स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:56 IST

'रहना है तेरे दिल में' सिनेमात तो अभिनेत्रीला तिला इंप्रेस करण्यासाठी तिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचतो. प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याने केलेल्या या कृतीमुळे सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र, हिरोच्या या वागणुकीचं माधवनने समर्थन केलं आहे. 

बॉलिवूडमधील सुपरहिट ठरलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अजुनही घर करून असलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'रहना है तेरे दिल में'. या सिनेमात आर माधवन, सैफ अली खान आणि दिया मिर्झा मुख्य भूमिकेत होते. माधवनने सिनेमात मॅडीची भूमिका साकारली होती. या सिनेमात तो अभिनेत्रीला तिला इंप्रेस करण्यासाठी तिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचतो. प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याने केलेल्या या कृतीमुळे सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र, हिरोच्या या वागणुकीचं माधवनने समर्थन केलं आहे. 

माधवनने नुकतीच इंडिया टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाच्या ट्रोलिंगबाबत तो म्हणाला, "त्या काळात फोन, मेसेज किंवा सोशल मीडिया नव्हता. मग तुम्ही एखाद्या मुलीशी कसा संपर्क कराल? कोणत्या प्रकारे तिच्याशी संवाद साधणं सभ्य मानलं गेलं असतं? त्या मुलीला भेटणं,तिचा पाठलाग करणं, तिच्याशी संवाद साधणं यामुळे माझ्या वडिलांच्या संस्कारांवर आरोप लावले गेले असते हे माहीत असूनही...जर हे लव्ह मॅरेज असतं तर त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा दुसरा कोणताच पर्याय नव्हता".

"आमच्या गावात प्रत्येक महिन्यात जत्रा भरायची. जेणेकरून इतर लोक भेटतील. आज तुम्ही शहरात मुलीला कसं भेटता? तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरला बारमध्ये तर भेटू शकत नाही, म्हणून तुम्ही तिकडे जात नाही. एका सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेल्या व्यक्तीसाठी एका मुलीलाल भेटण्याचं सगळ्यात चांगली संधी कोणती असू शकते? एक तर तुम्ही गणेशोत्सव किंवा होळीच्या दरम्यान त्यांना भेटू शकता. त्यामुळे तेव्हाच्या काळातही सणासुदीलाच भेटण्याची संधी असायची", असंही माधवनने सांगितलं. 

पुढे तो म्हणाला, "मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुलांना संधी द्या. आपण नाईट क्लबला जायचो तेव्हा १०० मुलांमधील २ मुलं वाईट असायची. ते मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करायचे. ज्यामुळे सर्व मुलांची बदनामी व्हायची. त्यातील १० मुलं ही मुलींसोबत सुसंस्कृतपणे संपर्क करण्याचा प्रयत्न करायची. किंवा हिंमत ठेवायची. बाकी ६० टक्के मुलं ही काहीही करण्यासाठी घाबरायची. पण, आता हा आकडा ९० टक्के झाला आहे. कारण, आता सगळी मुलं घाबरायला लागली आहेत". 

टॅग्स :आर.माधवनसेलिब्रिटी