Join us

दिव्यांनी उजळून निघालं आर माधवनचं दुबईतलं घर, मराठमोळ्या पत्नीच्या लूकने वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 15:11 IST

आर माधवन याने कुटुंबासोबत त्याच्या दुबईतील घरी दिवाळी साजरी केली.

   R Madhavan Dubai Home : देश-विदेशात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळी म्हणजे एक प्रकारे आनंदाचा उत्सवच असतो. घरावर रोषणाई, दिव्यांचा मंद प्रकाश, अंगणात डोळ्यांचे पारणे फेडणारी रांगोळी आणि विविध गोडधोड पदार्थांची यथेच्च मेजवानी यामुळे घर - परिसरात आनंदी वातावरण पसरलेले असते. प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघतं. दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कलाकारसुद्धा मागे नाहीत. कलाकारांचे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. लोकप्रिय अभिनेता आर माधवन यानेदेखील मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली आहे. 

आर माधवन याने कुटुंबासोबत त्याच्या दुबईतील घरी दिवाळी साजरी केली. दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ आर माधवनची पत्नी सरिता हिने शेअर केला आहे. ज्यात त्यांचे दुबईतले घर दिव्यांनी उजळून निघाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे आर माधवनची पत्नी सरिता बिरजे ही मराठी मुलगी आहे. सरिताने दिवाळीत खास मराठी लूक केल्याचं दिसून आलं. पैठणी साडी आणि नाकात नथ तिला शोभून दिसली.  

सरिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लक्ष्मीपूजन, दिव्यांची आरास, विविध खाद्यपदार्थ आणि दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांची झलकही पाहायला मिळाली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. आर माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'शैतान' सिनेमाने बक्कळ कमाई केली. लवकरच तो Adhirshtasaali सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. आर माधवनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिथरान जवाहर यांनी केले आहे. 

टॅग्स :आर.माधवनदुबईदिवाळी 2024