Join us
Daily Top 2Weekly Top 5

24 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह रोमान्स केल्याने चर्चेत होती ही अभिनेत्री, बोल्ड लूकमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 15:54 IST

'साला खडूस' या हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला होता

अभिनेत्री चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा मग सतत चर्चेत राहण्यासाठी कधी कधी हॉट फोटोशूट करत पब्लिसिटी मिळवताना दिसतात. अशाप्रकारेच पब्लिसिटी स्टंट करत चर्चेत राहतात. सोशल मीडियावर अशीच एक अभिनेत्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांना घायाळ करत असते. दाक्षिणात्य सिनेमाची अभिनेत्री रितीका सिंह सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

'साला खडूस' या हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला होता.'साला खडूस' सिनेमासाठी तिला ६३ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कामगीरी म्हणून पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच फिल्मफेअर हा पुरस्कारही तिला मिळाला आहे. 

रितीकाला पहिल्याच सिनेमात आर.माधवनसह काम करण्याची संधी मिळाली होती.आर.माधवनसह रितीका ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. पहिल्याच सिनेमातून इतक्या प्रसिद्ध अभिनेत्यासह झळकूनही हव तसे तिला यश मिळाले नाही. त्यामुळे अभिनयाने नाही तर तिच्या लूक्समुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. 

सोशल मीडियावर तिने असे अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. तिच्याशी निगडीत खास गोष्टी चाहत्यांसह शेअर करतान दिसते. रितीकाला अभिनयासोबतच मार्शल आर्टमध्येही तिला रस आहे. लहानपणापासून तिने किक बॉक्सिंग आणि मार्शल आर्टचे धडे गिरवले आहेत. तिच्या वडिलांनाची तिला हे प्रशिण दिले आहे.आगामी काळात रणवीर सिंहसोबत काम करण्याची ईच्छा असल्याचेही रितीकाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.  

टॅग्स :आर.माधवन