Join us

'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:13 IST

Samantha Ruth Prabhu: समांथा शेवटची करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दिसली होती.

'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' या आयटम डान्समधून समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) त्याचवेळी समांथाचे हिंदी भाषिक चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. समांथा लवकरच आयुषमान खुरानासोबत दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये मुख्य नायिका म्हणून सामंथाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल. त्याचवेळी समंथाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे तिला तिच्या चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवावे लागले. समांथा रुथ प्रभू सार्वजनिक ठिकाणी जाणेदेखील टाळत आहेत. समंथा रुथ प्रभू 'पॉलीमॉर्फ्स लाइट इराप्शन' नावाच्या त्वचेच्या आजाराशी सामना करत आहे, जो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो. समंथा सध्या सार्वजनिक कार्यक्रम आणि शूटिंगपासून दूर आहे, कामातून ब्रेक घेतला आहे.

समांथा शेवटची करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दिसली होती. यादरम्यान ती अक्षय कुमारसोबत दिसली. बॉलिवूड लाइफ या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव समांथाने 'खुशी' चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचे शूटिंगही पुढे ढकलले आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. समांथाने ३१ जुलै रोजी तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून एक महिन्याहून अधिक काळ ती सोशल मीडियापासून दूर होती. समांथाने तिच्या योद्धा चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर केला होता.

'खुशी' आणि 'यशोदा' व्यतिरिक्त सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिच्याकडे 'शकुंतलम' आणि 'सिटाडेल'चे हिंदी रिमेक सारखे प्रोजेक्ट्स आहेत.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीपुष्पा