Join us

Pulwama Attack : पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 16:25 IST

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली आहे.

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यात आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व आर्टिस्टला भारतात काम करण्यास बंदी आणली आहे.

AICWAचे जनरल सेक्रेटरी रौनक सुरेश जैन यांनी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये सांगितले की, असोसिएशनने जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांवर केलेल्या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्या विरोधात असोसिएशन राष्ट्रासोबत आहे.

 

पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची घोषणा करतो आहे. तरीदेखील जर कोणी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यासाठी जोर देत असेल तर असोसिएशनद्वारे त्यांच्यावर देखील बंदी आणली जाईल. त्यासोबत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्वात आधी देश येतो आणि आम्ही देशाच्या बाजूने उभे आहोत. 

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्ला