Join us
Daily Top 2Weekly Top 5

'निर्माते रात्री उशीरा घरी बोलवायचे आणि मग...', शर्लिन चोप्राचा धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 10:47 IST

अभिनेत्री शर्लिन चोप्रा बऱ्याचदा बोल्ड व ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा बऱ्याचदा बोल्ड व ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने फिटनेस व्हिडिओंतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता तिने स्वत: चे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करून मोठा खुलासा केला आहे. शर्लिनने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव रेडशेअर ठेवले आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केल्यानंतर तिने आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टीही पुन्हा उघड केल्या आहेत.

शर्लिन म्हणाली की एक काळ असा होता जेव्हा मी कामासाठी वेगवेगळ्या निर्मात्यांना भेटायची. त्यावेळी निर्माते मला रात्री उशिरा घरी जेवायला बोलवत असत. अशा गोष्टी ऐकल्यानंतर मला सतत राग येत होता. पण त्यावेळी समजले की मला वाचवण्यासाठी स्वत: स्वावलंबी असणे आवश्यक आहे म्हणून मी स्वतः एक अभिनेत्री आणि निर्माती बनली आहे. माझ्याकडे आता चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणून या प्लॅटफॉर्मवर मेंबरशीप देण्याच्या किंमतीवर प्रेक्षकांना चांगला कॉटेंट देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.

या प्लॅटफॉर्मवर लोकांना भरपूर मनोरंजन मिळेल आणि प्लॅटफॉर्मची किंमत प्रेक्षकांच्या बजेटमध्ये असेल.

या प्लॅटफॉर्मवर ग्लॅमरस व्हिडिओ आणि स्लाइड शो आता दाखवले जातील. नंतर यावर शॉर्टफिल्म व वेबसीरिजही पहायला मिळेल.

टॅग्स :शर्लिन चोप्रा