Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा- निक जोनासच्या लग्नात निक देणार मित्रांना 'हे' गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 13:13 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासला घेऊन लग्नाच्या चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

ठळक मुद्देया कपलने हा सोहळा खासगी राहिली याची पूर्ण काळजी घेतली आहे

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासला घेऊन लग्नाच्या चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत यांच्या लग्नाचा सोहळा चालणार आहे. अद्याप दोन्ही कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही.  

फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निकच्या भारताता होणाऱ्या लग्नात केवळ दोघांचे कुटुंबीयच सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर या कपलने हा सोहळा खासगी राहिली याची पूर्ण काळजी घेतली आहे. या लग्नात बॉलिवूडचे कोणतेच कलाकार सहभागी होणार नाहीत.  रिपोर्टनुसार निक आपल्या मित्रांना लग्नात एक कस्टमाइज लाइम स्कूटर देणार आहे. ज्याचा फोटो त्यांने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

 

या शाही लग्नात  प्रियांका फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल. यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास