रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नानंतर सगळ्यांच्या नजरा प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या लग्नावर खिळल्या आहेत. प्रियांका व निकच्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण येत्या १ डिसेंबरला निकयांका लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळतेय. अमेरिकन सिंगर निक जोनास कधीच लग्नासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याचे कुटुंबीयही भारतात आले आहेत. आता या लग्नासाठी हॉलिवूडचा एक खास पाहुणाही लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय. होय, हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉक प्रियांका व निकच्या लग्नात सहभागी होणार आहे.
प्रियांका व ड्वेन खूप चांगले मित्र आहेत. ‘बे वॉच’ या हॉलिवूडपटात दोघांनीही एकत्र काम केले होते. त्याच चित्रपटाच्या सेटवर ड्वेन व प्रियांका यांच्या घट्ट मैत्री झाली होती. आता इतकी घट्ट मैत्री असताना ड्वेन प्रियांकाचे लग्न कसे मिस करू शकतो?
यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.