Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Nick Wedding : प्रियंका आणि निक जोनासच्या शाही विवाहाचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:12 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये जगभरातील सेलेब्रिटींच्या मांदियाळीत हा विवाह सोहळा रंगला होता. १ डिसेंबरला निकचे वडील जोनास सिनीयर यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीने व  दुसऱ्या दिवशी हिंदु पद्धतीत लग्न पार पडले.

निक जोनासचे संपूर्ण कुटुंब यावेळी हजर होते. निकचे आप्त स्वकिय, भाऊ केविन आणि त्याची पत्नी डॅनियल, गेम ऑफ थ्रोन्सचे कलाकार सोफी टर्नर आणि फ्रँकी जोनास यांची विवाहाला हजर होते. प्रियंकाच्या बाजून तिचे सर्व मित्र आणि कुटुंबिय उपस्थितीत होते. निक जोनासच्या वडिलांनी वधू वरांचे अभिनंदन इन्स्टाग्रामवर केले आहे. दरम्यान प्रियंकाने लग्नाचे पहिले अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करुन त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. राल्फ लॉरेन्स याने डिझाईन केलेले कपडे त्यांनी परिधान केले होते. भारतीय डिझायनर सब्यासाची यांनी हिंदू पद्धतीच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते. यात निक सिल्कच्या शेरवानीमध्ये शोभून दिसला.  शुक्रवारी उमेद भवन पॅलेसमध्ये त्यांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. यावेळी सुंदर नक्षिकाम केलेली मेहंदी प्रियंकाच्या हातावर काढण्यात आली होती. शनिवारपासून लग्नसोहळा रंगत गेला. शाही थाटमाटाचे भोजन आणि त्यात भारतातील चविष्ट पदार्थांची रेलचेल परदेशी पाहुण्यांसाठी पर्वणी होती. नवविवाहित जोडीने यावेळी कुटुंबियांसह डान्समध्येही भाग घेतला. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास