Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणि अशाप्रकारे प्रियांका चोप्राने केले निक जोनासचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 09:15 IST

प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे.

ठळक मुद्देनिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात म्हटले होते की, न्यूयॉर्क मी लवकरच परतणार आहे.तो आता भारतात आला असून प्रियांकानेच इन्स्टाग्राम द्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. निक काल भारतात आला असून प्रियांकाने निकसोबतचा एक खूपच क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि तुझे घरी स्वागत आहे असे लिहिले आहे. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता चर्चा रंगली आहे ती प्रियांका चोप्राच्या लग्नाची. दीपिका आणि रणवीर यांनी इटलीत जाऊन लग्न करण्यास पसंती दिली तर प्रियांका भारतात लग्न करणार आहे. प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे.

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या पाच दिवसांमध्ये निक-प्रियांकाचा विवाहसोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  निक दोन दिवसांपूर्वी भारताच्या दिशेने रवाना झाला होता. निकनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात म्हटले होते की, न्यूयॉर्क मी लवकरच परतणार आहे. तो आता भारतात आला असून प्रियांकानेच इन्स्टाग्राम द्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. निक काल भारतात आला असून प्रियांकाने निकसोबतचा एक खूपच क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि तुझे घरी स्वागत आहे असे लिहिले आहे. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा मेहंदी, संगीत कार्यक्रम २९ व ३० नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. संगीत सेरेमनीसाठी कोरियोग्राफरला बोलवण्यात आले असून गणेश हेगडे डान्स बसवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक या कार्यक्रमात देसी गर्ल या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यावर गणेश त्याला डान्स शिकवणार आहे.

निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले आहेत. प्रियांका आणि निक यांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

ग्नात कोणतीच कमतरता येऊ नये यासाठी चोप्रा कुटुंब प्रचंड प्रयत्न करत आहे. अलीकडे प्रियांका चोप्रा आई मधू चोप्रासोबत जोधपूरला गेली होती. येथे त्यांनी उमेद भवन आणि मेहरानगड किल्ल्यात सुुरू असलेल्या लग्नाच्या तयारीची पाहणी केली. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासनिक जोनासप्रियंका चोप्रा