Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राचा मिळाल्या बालदिनाच्या शुभेच्छा, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:36 IST

प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली.

ठळक मुद्दे‘जगातील सगळ्यांत स्टाईलिश पुरूषाला किस करताना स्वत:ला नशीबवान समजते,’ असे कॅप्शन प्रियांकाने लिहिले. या कॅप्शननंतर तर ट्रोलर्सला आणखीच जोर चढला.

प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली. ‘जगातील सगळ्यांत स्टाईलिश पुरूषाला किस करताना स्वत:ला नशीबवान समजते,’ असे कॅप्शन प्रियांकाने लिहिले. या कॅप्शननंतर तर ट्रोलर्सला आणखीच जोर चढला. टोलर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्यात. एका ट्रोलरने तर हा फोटो पाहून प्रियांकाला चक्क बालदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. एका युजरला प्रियांकाची ही कमेंट वाचून रजनीकांत आठवला. मोस्ट स्टायलिश मॅन तर रजनीकांत आहे, असे हा युजर म्हणाला. निक हा प्रियांकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रियांका व निकच्या वयातील अंतरावरून दोघांनाही ट्रोल केले जात आहे. अर्थात प्रियांकाला यामुळे फरक पडत नाही.

यावर्षी आॅगस्टमध्ये निकयांकाचा मुंबईत ‘रोका’ झाला होता. यानंतर प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात  ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. प्रियांका व निक दोघेही ग्लोबल स्टार  असल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली.  नुकतेच मुंबईत निकयांकाचे वेडिंग रिसेप्शन झाले. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

  लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या   यापूर्वी 'सात खून माफ' या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.  

 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास