Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोनास कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन, प्रियंका चोप्राच्या जाऊबाईने दिला मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 10:21 IST

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा काकू झाली आहे. होय, प्रियंकाची जाऊबाई अर्थात अभिनेत्री सोफी टर्नर आई बनली आहे.

ठळक मुद्दे सोफी आणि प्रियंकामध्ये देखील खूप चांगले बाँडिंग दिसून येते. दोघीही त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा काकू झाली आहे. होय, प्रियंकाची जाऊबाई अर्थात अभिनेत्री सोफी टर्नर आई बनली आहे. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने जोनास कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. 22 जुलैला  सोफीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोफी व जो जोनास यांनी आपल्या मुलीचे नाव Willa ठेवले आहे.

 

 सोफी टर्नर प्रेग्नंसीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होती.  सोफीचे प्रेग्नन्सी दरम्यानचे अनेक फोटो या काळात व्हायरल होत होते.  सोफी टर्नर व जो जोनास 2016 पासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. गतवर्षी मे महिन्यात एका सरप्राईज सेरेमनीत दोघांनी लग्न केले होते. यानंतर जून महिन्यात पॅरिसमध्ये दोघांचे धुमधडाक्याने लग्न झाले होते. जोच्या लग्नाआधी निक जोनास व प्रियंकाचे लग्न झाले होते. सोफी व जो या लग्नाला हजर होते.

 सोफी आणि प्रियंकामध्ये देखील खूप चांगले बाँडिंग दिसून येते. दोघीही त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. नात्याने प्रियंका सोफीची   जाऊबाई आहे. मात्र वयाने सोफी प्रियंकापेक्षा खूप लहान आहे.  

लग्नाच्या 24 तासांआधी ब्रेकअप अन् मग पॅचअपसोफी टर्नर व जो यांची लव्हस्टोरी प्रचंड इंटरेस्टिंग आहे.  लग्नाच्या आधी जो आणि तिचे ब्रेकअप झाले होते. सोफी खुद्द याचा खुलासा केला होता. ‘लग्नाला 24 तास बाकी असताना आम्ही दोघे वेगळे झालो होतो. 24 तासांसाठी दोघांनी ब्रेकअप केले होते.   हे ब्रेकअप कोणत्या वादामुळे झाले नव्हते तर लग्नाच्या काहीवेळा आधी वाटणा-या भीतीमुळे झाले होते. तो दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील सगळ्या खराब दिवस होता. मात्र ब्रेकअप झाल्यानंतरच्या 24 तासांत आम्ही पुन्हा एकमेकांसोबत होतो.  जो ने तिला स्वत:वर प्रेम करायला शिकवले,’असे ती म्हणाली होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रा