Join us
Daily Top 2Weekly Top 5

होली है...! प्रियंका चोप्राने असे मस्त उधळले होळीचे रंग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 10:46 IST

कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मग बॉलिवूड कसे मागे राहिल?

ठळक मुद्देप्रियंकाने वयाच्या १७व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे.

कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मग बॉलिवूड कसे मागे राहिल? बॉलिवूड सेलिब्रिटीही होळीच्या मस्तीत धूंद आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने दणक्यात होळी साजरी केली. पती निक जोनास आणि सासरच्यांसोबत प्रियंकाने धम्माळ रंग उधळले.

प्रियंका चोप्रा सध्या विदेशात आहे. पण कोणताही भारतीय सण साजरा करणे ते विसरत नाही. आता प्रियंकाने होळीचे फोटो शेअर केले आहेत. यात ती होळी खेळताना दिसत आहेत.

खास म्हणजे, पती निकसोबत तिच्या सासरची मंडळीही होळी खेळत आहेत. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीचा सण माझ्या आवडत्या सणांपैेकी एक आहे. तुम्ही सगळे आपल्या जवळच्या लोकांसोबत हा सण साजरा कराल, अशी आशा आहे.पण आपआपल्या घरात़ हॅपी होली, असे तिने लिहिले आहे.या फोटोत प्रियंका, निक व तिचे सासूसासरे दिसत आहेत.

प्रियंकाने वयाच्या १७व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे. मिस इंडिया ते बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ होण्याचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्येही आपला अभिनयाची चुणूक दाखविली. आज ती इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनाससह लग्नगाठ बांधून प्रियंका अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा