Priyanka Chopra : जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच प्रियंकाने इंस्टाग्रामवर आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. मात्र, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा फोटो दुसरा कोणाचा नसून एकेकाळचे चर्चेतील जोडपे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा आहे.
प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो टीव्ही स्क्रीनचा आहे. प्रियंका आपल्या घरी संजय लीला भन्साळी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' पाहत होती. चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्याचा एक रोमँटिक सीनचा फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहताच चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. प्रियंकाची ही पोस्ट व्हायरल होताच युझर्सनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. एका युझरने मजेशीरपणे लिहिले, "ऐश्वर्या विचार करत असेल, प्रियंका तू हाच फोटो का टाकलास?". तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, "इतक्या वर्षांनंतरही सलमान-ऐश्वर्याने पुन्हा एकदा इंटरनेटवर ताबा मिळवला आहे".
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या प्रकरणांपैकी एक आहे. सुमारे तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ऐश्वर्याने सलमानसोबत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. आज ऐश्वर्या आपल्या संसारात सुखी आहे, तर सलमान खान ६० व्या वर्षीही अविवाहित आहे. मात्र, प्रियंकाच्या एका पोस्टमुळे सलमान आणि ऐश्वर्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Priyanka Chopra shared a photo of Salman Khan and Aishwarya Rai from 'Hum Dil De Chuke Sanam', sparking nostalgia. The post quickly went viral, triggering user comments and reigniting discussions about their past relationship.
Web Summary : प्रियंका चोपड़ा ने 'हम दिल दे चुके सनम' से सलमान खान और ऐश्वर्या राय की एक तस्वीर साझा की, जिससे पुरानी यादें ताजा हो गईं। पोस्ट तेजी से वायरल हो गया, यूजर्स ने टिप्पणियां कीं और उनके पुराने रिश्ते पर चर्चा फिर से शुरू हो गई।