Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्  हुंदके देत रडू लागला प्रियंका चोप्रा पती निक जोनास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 16:05 IST

प्रियंकाने पती निक जोनास याच्याबद्दल असा काही किस्सा सांगितला की, सगळेच थक्क झालेत.

ठळक मुद्दे ‘स्काय इज पिंक’ या सिनेमात प्रियंका व फरहान अख्तर लीड भूमिकेत आहेत.  हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे.

लवकरच प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. होय, गेल्या अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियंकाचा ‘स्काय इज पिंक’ हा बॉलिवूड सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. येत्या दिवसांत प्रियंका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होईल. तत्पूर्वी प्रियंका टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पोहोचली. यावेळी प्रियंकाने पती निक जोनास याच्याबद्दल असा काही किस्सा सांगितला की, सगळेच थक्क झालेत.

होय,‘स्काय इज पिंक’चा प्रियंकाचा एक सीन बघून निक इतका भावूक झाला होता की, अगदी ढसाढसा रडला होता. खुद्द प्रियंकाने हा किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, ‘स्काय इज पिंकच्या शूटींगचा तो अखेरचा दिवस होता. त्यामुळे दिग्दर्शिका सोनाली बोस हिने छोटीशी शँपेन पार्टी ठेवली होती. सोनालीने निकलाही या पार्टीला बोलवले. पण निक वेळेआधीच सेटवर पोहोचला. मी शूटींगमध्ये बिझी होते. अंधारात सीन शूट केला जात होता. निक हा सीन बघताना इतका भावूक झाला की, अक्षरश: हुंदके देत रडू लागला. मला याबद्दल काहीही ठाऊक नव्हते. पण निक रडत असताना सोनाली त्याच्या अगदी बाजूला उभी होती. तिने त्याला रडताना पाहिले आणि नंतर मला सांगितले.’

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंका तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलली होती. मला आई व्हायचे आहे. पण त्याआधी निकसाठी न्यूयॉर्कमध्ये एक घर घ्यायचे आहे, असे ती या मुलाखतीत म्हणाली होती.

 ‘स्काय इज पिंक’ या सिनेमात प्रियंका व फरहान अख्तर लीड भूमिकेत आहेत.  हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे. साहजिकच त्यात अनेक भावूक करणारी दृश्ये आहेत. या सिनेमात प्रियंका आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास