Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राचा नवरा 'निक'चं खरं नाव माहितेय? कपिल शर्माच्या शोमध्ये 'देसी गर्ल'ने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:29 IST

निक जोनस नाही तर 'हे' आहे प्रियांकाच्या पतीचं खरं नाव!

'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज अभिनेत्री सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच प्रियंकाचं खाजगी आयुष्य कायम चर्चेत असतं.  २०१८ मध्ये प्रियंकानंहॉलिवूड सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. प्रियंका आणि निक चाहत्यांचं सर्वात लाडके जोडपे आहे. या जोडीबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंकाच्या पतीला आपण सर्वजण निक जोनस या नावाने ओळखतो. पण तुम्हाला निकचं 'खरं नाव' माहीत आहे का?  खुद्द प्रियंकाने तिच्या लाडक्या पतीच्या नावाबाबत खुलासा केलाय.

नुकतंच प्रियंका चोप्रा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आली होती. तिने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी प्रियंकानं पती निक जोनासचं खरं नावही सांगितलं. तिनं सांगितलं की निक जोनस नाही तर निकचं नाव हे "निकोलस जेरी जोनस" असं आहे. 

दरम्यान, प्रियंका चोप्रा ६ वर्षांनी भारतीय चित्रपटांमध्ये परतत आहे. ती सध्या एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट वाराणसीचे शूटिंग करत आहे. चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka reveals Nick Jonas' real name on Kapil Sharma show.

Web Summary : Priyanka Chopra revealed Nick Jonas' full name, Nicholas Jerry Jonas, on 'The Great Indian Kapil Show'. She's also returning to Indian cinema after six years, filming a movie directed by SS Rajamouli.
टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनासकपिल शर्मा