Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोफी टर्नरच्या आरोपांवर प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासनं सोडलं मौन, म्हणाला-वाईट काळात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 16:37 IST

टस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना दोघांमधील एक नवा वाद समोर आला आहे.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचं कुटुंब सध्या चर्चेत आहे. प्रियंकाची जाऊबाई आणि दीराने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.  लवकरच दोघांचा घटस्फोट होणार आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना दोघांमधील एक नवा वाद समोर आला आहे.

 सोफीने पतीविरोधात खटला दाखल करुन  आपल्या मुलींना परत करण्याची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार, सोफी टर्नरने  जो जोनास विरुद्ध खटला दाखल केला आहे. अभिनेत्रीने कोर्टात दावा दाखल केला आहे आणि आपल्या मुलींना इंग्लंडला परत येण्याची मागणी केली आहे. "वडिलांनी मुलींनी इंग्लंडला परत जाण्यापासून रोखले आहे, त्याने अधिकारांचे उल्लंघन केलं आहे, इंग्लंड हे मुलांचे नेहमीचे निवासस्थान आहे," खटल्यात म्हटलं आहे. सोफीला मुलींचा पासपोर्ट परत हवा आहे जेणेकरुन तिने मुलींना आपल्यासोबत इंग्लंडला घेऊन जाऊ शकेल. 

 सोफीने केलेल्या या आरोपांवर आता जो जोनासने मौन सोडलं आहे. तो म्हणाले की, अपहरण असा शब्द वापरला की तो दिशाभूल करण्यासारखा होतो. वाईट काळात कायदेशीर व्यवस्थेचा गैरवापर होतो. दोघेही मुलींची जबाबदारी वाटून घेण्यास तयार होते. मुलींच्या पालनपोषण यूके आणि यूएस या दोन्ही देशांमध्ये व्हावे अशी दोघांची इच्छा आहे.

 जो आणि सोफी यांना दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचे नाव विलाअसून ती तीन वर्षांची असून दुसरी मुलगी अवघ्या 14 महिन्यांची आहे. फ्लोरिडा न्यायालयाने मुलांच्या पालकांना आधीच आदेश दिले होते की, त्यांना मुलांसोबत कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही. काही दिवसांपूर्वी  सोफी आणि जो यांची भेट झाली होती या भेटीदरम्यान, दोघांनीही त्यांच्या मुलींना इंग्लंडला परतण्यासाठी त्यांच्या करारावर सहमती दर्शवली.  मात्र त्यानंतर सोफीला मुलांना घेऊन इंग्लंडला घेऊन जायचे आहे. 

टॅग्स :सोफिया टर्नर