Join us
Daily Top 2Weekly Top 5

 काय म्हणता, एकाही बॉलिवूड स्टारला आपल्या लग्नात बोलवणार नाही प्रियांका चोप्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 12:12 IST

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाबद्दलची एक ताजी बातमी आहे. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. साहजिकचं  पीसीच्या लग्नाकडे अख्ख्या बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाबद्दलची एक ताजी बातमी आहे. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. साहजिकचं  पीसीच्या लग्नाकडे अख्ख्या बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. पण ताज्या बातमीनुसार, आपल्या लग्नात प्रियांका कुण्याही बॉलिवूड स्टारला निमंत्रित करणार नसल्याचे कळतेय.पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, कुण्याही बॉलिवूड स्टारला प्रियांका व निकच्या लग्नाचे निमंत्रण नसेल. याआधी प्रियांका सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, सिद्धार्थ राय कपूर यांना लग्नाचे निमंत्रण देणार अशी बातमी होती. पण आता या लग्नात केवळ प्रियांका व निकचे अतिशय जवळचे नातेवाईक व मित्र सामील होतील, असे कळतेय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल. यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल.निक आणि प्रियांका एकदा नाही तर दोनदा लग्न करणार, असेही करतेय. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा हेणार आहे. अर्थात  याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे लग्न शाही होणार, यात शंका नाही.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास