Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच नजरेच प्रियंका चोप्राच्या प्रेमात पडला होता निक जोनास, ग्रीसमध्ये 'देसी गर्ल'ला केलेले प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:54 IST

पाच वर्षांपूर्वी जोधपूरच्या उमेद भवनमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि निक जोनास आज त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करतायेत. पाच वर्षांपूर्वी जोधपूरच्या उमेद भवनमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. कपल एक मालती मेरी नावाची क्युट मुलगी देखील आहे. लग्नाआधी दोघांच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली होती. 

निक जोनास पहिल्या नजरेत प्रियंका चोप्राच्या  प्रेमात पडला होता. एका मुलाखतीदरम्यान निकने सांगितले की, 'द व्हॅनिटी फेअर ऑस्कर पार्टी'मध्ये पहिल्यांदाच तो प्रियांकाला पहिलं होतं. 2017 मध्ये मेट गालाच्या काही महिन्यांपूर्वी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.

निक जोनासने ट्विटरवर प्रियंका चोप्राचा नंबर मागितला होता. त्यानंतर निक जोनासला प्रियांकाचा फोन नंबर मिळाला.  दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मेसेजच्या माध्यमातून दोघे एकमेकांशी बोलायचे. जसजशी ओळख वाढू लागली तसे एकमेकांमध्ये दोघे गुंतत गेले. पहिल्या भेटीनंतर सहा महिने उलटल्यावर दोघांनी भेटण्याचा निर्णय.  मे २०१७मध्ये आम्ही मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले होते.

प्रियंका चोप्राच्या वाढदिवशी निक जोनासने तिला ग्रीसमध्ये अंगठी घालून प्रपोज केले होते. काही सेकंद शांत राहिल्यानंतर अभिनेत्रीने हो असे उत्तर दिले. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला देश-विदेशातून अनेक पाहुणे आले होते. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास