Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 17:59 IST

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर प्रियांकाने दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे प्रियांका-निक मुंबईतसुद्धा रिसेप्शन पार्टी देणार आहेतया पार्टीत बॉलिवूडचे कलाकार आणि बिझनेसमन सहभागी होतील.    

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर प्रियांकाने दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका-निक मुंबईतसुद्धा रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या रिसेप्शन पार्टीसंबंधी अजून काही माहिती मिळू शकलेली नाही.     

याआधी 15 किंवा 16 डिसेंबरला प्रियांका मुंबईत रिप्सेशन देईल अशी माहिती होती. मात्र आम्हाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही पार्टी 19 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निकने सांताक्रूझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टीचा वेन्यू फायनल केला आहे. या पार्टीत बॉलिवूडचे कलाकार आणि बिझनेसमन सहभागी होतील.    

 

गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.त्यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास