Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज, ‘पिग्गी चॉप्स’च्या फोटोमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 18:23 IST

प्रियंका गर्भवती असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊन आणि सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास गेल्या वर्षी रेशीमगाठीत अडकले. १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं असून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. याच गोष्टीचं निमित्त साधत फॅन्सनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत प्रियंकासह तिचा पती निक आहेच. शिवाय या दोघांसह फोटोत बाळही पाहायला मिळत आहे.

 

अशाच एका फोटोत प्रियंकानं बाळाला जवळ घेतलंय आणि निक त्याच्या डोक्यावरून हात फिरवत पाहत असल्याचं दिसत आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियंका लवकरच गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियंका गर्भवती असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊन आणि सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे या फोटोमुळे प्रियंका-निकच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरूवातीलाच प्रियंका गर्भवती असल्याचे वृत्त आलं होतं. मात्र यानंतर लगेचच प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी या वृत्ताचा इन्कार करत निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास