Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसणार 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा, कधी प्रदर्शित होणार एपिसोड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:32 IST

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये लागणार देसी गर्लचा तडका!

The Great Indian Kapil Show 4: कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा चौथा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या लोकप्रिय कॉमेडी शोच्या आगामी सीझन ४ मधील एका एपिसोडमध्ये बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि आंतरराष्ट्रीय स्टार प्रियंका चोप्रा ही खास पाहुणी म्हणून येणार आहे. प्रियंकाच्या उपस्थितीमुळे हा एपिसोड खूपच खास ठरणार असून, चाहत्यांमध्ये या एपिसोडबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहुप्रतिक्षित एपिसोडच्या शूटिंग दरम्यानचे प्रियंकाचे सुंदर फोटो समोर आले आहेत. तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ४'च्या शुटिंगसाठी प्रियंका चोप्राने तिचा खास देसी आणि वेस्टर्नचा संगम असलेला लूक निवडला. अभिनेत्रीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा फुलांचा ऑफ-द-शोल्डर कॉर्सेट घातला होता. शोचा होस्ट कपिल शर्मासोबत प्रियंकाने खास पोझ दिल्या. यावेळी कपिलही डॅशिंग दिसत होता. त्याने काळ्या रंगाचा पार्टी वेअर आउटफिट आणि ब्राऊन शेड्स घालून आपला लूक पूर्ण केला होता.

'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ४' ची रिलीज तारीखही अखेर जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉमेडी शो २० डिसेंबर २०२५ पासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि कपिल शर्मा यांची जुगलबंदी नेहमीच खास असते. आता कपिल प्रियंकाला नेमके कोणते प्रश्न विचारतो आणि प्रियंका आपल्या खास शैलीत कोणते मनोरंजक किस्से आणि मोठे खुलासे करते, याबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'वाराणसी' चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत झळकणार आहे.  याशिवाय, तिच्याकडे 'द ब्लफ', 'जजमेंट डे' आणि 'सिटाडेल २' यांसारखे मोठे हॉलिवूड प्रोजेक्ट्स देखील आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra to appear on 'The Great Indian Kapil Show'.

Web Summary : Priyanka Chopra will grace 'The Great Indian Kapil Show' Season 4 on Netflix. She was seen with Kapil Sharma during the shoot. The show will stream from December 20, 2025. Priyanka is also set to star in S.S. Rajamouli's 'Varanasi'.
टॅग्स :प्रियंका चोप्राकपिल शर्मा नेटफ्लिक्स