Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! भर कार्यक्रमात प्रियंका चोप्राने केला मनीष मल्होत्राचा ‘इन्सल्ट’; पाहणारे झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:14 IST

बॉलिवूडमध्ये रंगली खमंग चर्चा ...

ठळक मुद्देप्रियंका नुकतीच ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूड सिनेमात झळकली होती.

प्रियंका चोप्रा नुकतीच भारतात येऊन गेली. निमित्त होते, मुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2020’ या सोहळ्याचे. या सोहळ्यात प्रियंकाने निळ्या रंगाच्या साडीत स्टाईलश एन्ट्री घेतली.  पण हे काय? एन्ट्रीलाच मनीष मल्होत्रासारख्या बॉलिवूडच्या दिग्गज फॅशन डिझाईनरची तिने असा काही ‘इन्सल्ट’ केला की, पाहणा-यांच्या भुवया उंचावल्या. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत प्रियंका सर्वांसमोर मनीष मल्होत्राला इग्नोर करताना दिसतेय.

फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत  अरबाज खान, त्याची गर्लफ्रेन्ड, डायना पेन्टी, मनीष मल्होत्रा, शिल्पा शेट्टी व तब्बू पहिल्या रांगेत बसलेले दिसताहेत. याचदरम्यान प्रियंकाची एन्ट्री होते. प्रियंका सर्वप्रथम अरबाजच्या गर्लफ्रेन्डशी हात मिळवते. यानंतर ती डायनाला मिठी मारते. डायनाच्या बाजूलाच मनीष मल्होत्रा बसलेला असताना प्रियंका त्याच्याकडे ढुंकूनही न बघता शिल्पा शेट्टीकडे वळते. शिल्पाला भेटल्यानंतर ती तब्बूचीही गळाभेट घेते आणि तिथून माघारी वळते. यादरम्यान मनीष प्रियंकाकडे अवाक् होऊन नुसता बघत राहतो.

खरे तर प्रियंका व मनीष एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मनीषच्या घरच्या पार्ट्यांना ती सर्रास दिसते. असे असताना ‘उमंग 2020’ सोहळ्यात तिने मनीषला इग्नोर का करावे? हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. साहजिकच प्रियंकाच्या या टिक टॉक व्हिडीओवरून सध्या बॉलिवूडमध्ये खमंग चर्चा रंगली आहे.प्रियंका नुकतीच ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूड सिनेमात झळकली होती. अर्थात तिच्या या कमबॅक सिनेमाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. अद्याप प्रियंकाने बॉलिवूडचा कुठलाही सिनेमा साईन केलेला नाही.

टॅग्स :प्रियंका चोप्रामनीष मल्होत्रा