Join us
Daily Top 2Weekly Top 5

निक जोनसवर पुन्हा चढली बॉलिवूडची नशा, कॉन्सर्टच्या आधी केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:37 IST

प्रियंकाचा पती निक जोनस हा बॉलिवूडच्या गाण्याच्या फॅन आहे हे सगळ्यांच माहिती आहे.

प्रियंकाचा पती निक जोनस हा बॉलिवूडच्या गाण्याच्या फॅन आहे हे सगळ्यांच माहिती आहे. निक आपल्या कॉन्सर्टच्या बॉलिवूडची गाणी ऐकतोय असे एक मुलाखती दरम्यान प्रियंकाने सांगितले होते. निकने आयुषमान खुरानाच्या 'मोरनी बनके' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये निकने ऑरेंज कलरचा सूट परिधान केला आहे.  

निक जोनसला पंजाबी गाणी खूप आवडतात. तो प्रियंकासोबत पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसला आहे. काही दिवसांपूर्वी निक वरुण धवनच्या बाकी सब फर्स्ट क्लास है गाण्यावर थिरकताना दिसला होता.  

येत्या शुक्रवारी प्रियंकाचा द स्काय इज पिंक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निकने हा सिनेमा बघितल्यानंतर प्रियंकाला सोशल मीडियावर एक खास मेसेज दिला होता. हा सिनेमा पाहताना तो खूपच भावुक झाला होता असे प्रियंकाने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. निकच्या डोळ्यात अश्रू होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने लगेचच या चित्रपटाची दिग्दर्शक शोनाली बोसला फोन केला आणि या चित्रपटाने त्याच्या मनाला स्पर्श केला असे सांगितले होते. प्रियंकासह यात फरहान अख्तर आणि जायरा वसीमची मुख्य भूमिका आहे.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास