Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता? प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:26 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात.

ठळक मुद्देजुमानी यांनी याआधी प्रयंकाच्या लग्नाबाबत भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे त्यांची ही भविष्यवाणी अचूक ठरली होती.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात. अनेकदा ती प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या. सर्वप्रथम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 मधील तिचे फोटो पाहून प्रियंका प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले.

यानंतर प्रियंका आई मधु चोप्रा यांच्यासोबत मुंबईत एका हॉस्पिलबाहेर दिसली आणि  तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना आणखीच जोर चढला. शेवटी मधू चोप्रा यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचा खुलासा करावा लागला. अर्थात तरीही प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा थांबल्या नाहीत.

सध्या प्रसिद्ध एस्ट्रो न्युमरोलॉजिस्ट संजय बी जुमानी यांनी प्रियंकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. येत्या 24 महिन्यात प्रियंका आई होणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले आहे.   जुमानी यांनी याआधी प्रियंकाच्या लग्नाबाबत भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे त्यांची ही भविष्यवाणी अचूक ठरली होती.

  संजय बी जुमानी यांच्या मते, प्रियंकासाठी 9 नंबर सर्वात लकी आहे. तिची डेट ऑफ बर्थ  18.07.1982 आहे. त्यानुसार, तिच्या जन्मतारखेची बेरीज 9 येते. ज्यावर्षी तिचा जन्म झाला त्यातही 9 हा अंक आहे. सध्या प्रियंकाचे वय 36 वर्षांपेक्षा जास्त असून 36 यांची बेरीजही 9 येते.प्रियंका 18 व्या वर्षी (18=9) व्या वर्षी मिस वर्ल्ड झाली होती. तिचे फॅशन आणि दोस्ताना हे दोन सिनेमासुद्धा तिच्या वयाच्या 27 (27=9) व्या वर्षी रिलीज झाले होते. तसेच तिचे लग्न सुद्धा 36 व्या (36=9) वर्षी झाले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास