Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने थोडक्यात समुद्रात बुडता बुडता वाचली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 12:35 IST

गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकताच मोठ्या थाटा-माटात आपल्या बर्थ डे चे सेलिब्रेशन केले. प्रियंकाच्या बर्थ डेला खास बनवण्यासाठी तिचा पती निक जोनासने मोठी सप्राईज पार्टी दिली. प्रियंका आपल्या जवळच्या मित्र-परिवारासोबत मियामी बिचवर खूप मस्ती करताना दिसली. या दरम्यान प्रियंका जेट स्की चालवताना सुद्धा दिसली. 

या पार्टीतला एक फोटो सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेतो आहे या फोटोमध्ये प्रियंका तोल जाऊन ती पाण्यात पडताना दिसतेय. प्रियंकाचा पाण्यात पडतानाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतो आहे. या फोटोत प्रियंकाचा पती निक जोनस तिचा पाय पकडून तिला वाचवण्याच्या प्रयत्न करताना दिसतोय मात्र तरीदेखील ती पाण्यात पडली. 

प्रियंकाची ही बर्थ डे पार्टी चांगलीच गाजली. या पार्टीतला एका फोटोवर प्रियंकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. या फोटोत प्रियंकाच्या हातात सिगारेट आहे तर तिच्या आईच्या हातात सिगार होते. हे फोटो व्हायरल झालेत आणि प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल झाली.  दिवाळीत फटाके न उडवण्याचे आणि अस्थमा असल्याचे सांगणारी प्रियंका आई आणि पतीसोबत सिगारेटचे झुरके घेत आहे, हे पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले. सिगारेट ओढताना तुला अस्थमा आठवला नाही का? असे एका युजरने तिला सुनावले. तर अनेकांनी यापुढे आम्हाला शिकवू नकोस, अशा शब्दांत फैलावर घेतले.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात बिझी आहे. या सिनेमातून तीबॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. निक जोनास याचाही ‘मिड वे’ हा सिनेमा यंदा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. खुद्द निकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतीच ही माहिती दिली होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास