Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् पती निक जोनासमुळे अधुरी राहिली प्रियंका चोप्राची इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 12:04 IST

प्रियंकाने जिम्मी फेलेनचा लोकप्रीय चॅट शो ‘द टुनाईट शो’मध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने आपल्या लग्नाबद्दलचे अनेक खुलासे केलेत.

ठळक मुद्देलवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूडपटातही ती दिसणार आहे.

अमेरिकन सिंगर निक जोनास आणि ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा सध्या सेलिब्रेशन मूडमध्ये आहेत. लग्न झाले तेव्हापासून दोघेही सुट्टीवर आहेत. यादरम्यानच्या त्यांच्या रोमान्सचीही प्रचंड चर्चा आहे. कारण एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो, व्हिडीओ शेअर करण्याची एकही संधी निकयंका सोडत नाहीत.नुकतीच प्रियंकाने  जिम्मी फेलेनचा लोकप्रीय चॅट शो ‘द टुनाईट शो’मध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने आपल्या लग्नाबद्दलचे अनेक खुलासे केलेत. अगदी लग्नाच्या प्लानिंगपासून तर वेन्यू ठरवण्यापर्यंतचे अनेक खुलासे तिने केलेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण प्रियंकाला एखाद्या सुंदर बेटावर लग्न करायचे होते. पण निक जोनासला मात्र भारतातचं लग्न हवे होते.

होय, खुद्द प्रियंकाने याबद्दल माहिती दिली. जोधपूरमध्ये लग्न करण्याचा निर्णय निकचा होता. माझ्या डोक्यात मालदीव व मॉरिशससारखे अनेक पर्याय होते. पण याठिकाणी लग्न करायचे म्हटल्यावर काही तांत्रिक अडचणीही होत्या. त्यातचं भारतातचं लग्न हवे, हा निकचा आग्रह होता, असे प्रियंकाने सांगितने.लग्नानंतर नाव का बदलले, याचेही उत्तरही प्रियंकाने यावेळी दिले. मला माझ्या नावासोबत त्याचे नाव हवे होते. लग्नानंतर आम्ही एका कुटुंबाचा भाग आहोत, ही भावना त्यामागे होती. मी याबाबतीत थोडी जुन्या मताची आहे. माझी ओळख न पुसता मी माझ्या नावात त्याला सामावून घेतले, असे ती म्हणाली.

लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूडपटातही ती दिसणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर व जायरा वसीम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासप्रियांका चोप्रा आणि निक जोनास