Join us
Daily Top 2Weekly Top 5

“त्याने मला विवस्त्र होण्यास सांगितलं”, प्रियांका चोप्राचा दीर जो जोनासवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 16:48 IST

एकीकडे घटस्फोटाची चर्चा सुरू असताना प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने जो जोनासवर गंभीर आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा दीर जो जोनास त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जो जोनास त्याची पत्नी आणि अभिनेत्री सोफी टोनरला घटस्फोट देत विभक्त होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. जो जोनासने घटस्फोटासाठी कायदेशीर कारवाई सुरू करत अर्जही दाखल केला आहे. एकीकडे घटस्फोटाची चर्चा सुरू असताना प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने जो जोनासवर गंभीर आरोप केले आहेत.

निकलोडियन स्टार अलेक्सा निकोलस हिने जो जोनसवर गंभीर आरोप केले आहेत. अलेक्सा आणि जो जोनसने एका टीव्ही शोमध्ये एकत्र काम केलं होतं. अलेक्साने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून तिने जो जोनसवर आरोप केले आहेत. “जो जोनसला मी किशोरवयात(teenage) भेटले होते. तो एक असा व्यक्ती आहे ज्याने प्युरिटी रिंग घातली असूनही मला विवस्त्र होण्यास सांगितलं होतं,” असं अलेक्साने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला

जो जोनासने अलेक्साच्या या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. निक जोनास, जो जोनास आणि केविन हे तिघेही भाऊ प्युरिटी रिंग घालतात. यानुसार, ते लग्नाच्या आधी कोणाबरोबरही शरीरसंबंध ठेवणार नाहीत. निक जोनासने प्रियांका चोप्राबरोबर लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे. त्यांना मालती ही मुलगी आहे. तर जो जोनास आणि सोफी टोनरला दोन मुली आहेत.

Video : कपाळाला चंदन, भगवे कपडे अन्...; महादेवाच्या दर्शनाला पोहोचला अक्षय कुमार, व्हिडिओ व्हायरल

जो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर २०१९मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. परंतु, लग्नाच्या चार वर्षांनी आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासजो जोनाससोफिया टर्नर