Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून प्रियंका म्हणतेय वर्क फ्रॉम होमच आहे बेस्ट, घरीच बसून होतायेत तिची सगळी काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 16:56 IST

निक प्रियंकाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास सध्या त्यांचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. निक प्रियंकाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.   

कोरोनाने थैमान घातल्यानंतर दोघेही एकमेकांची जरा जास्तच काळजी घेत आहेत. निक Type 1 डायबिटिक आहे तर प्रियंका दम्याच्या आजार आहे. त्यामुळे थोडंही दुर्लक्ष केले तर दोघांसाठी खूप घातक ठरू शकते. सध्या दोघांनाही कोरोनाने चांगलीच धडकी भरवली आहे. कोरोनापासून बचावासाठी शक्य तितके उपाय करत असून कोरोनाची लागण होणार नाही यासाठी सुपर केअरफुल असल्याचे प्रियंकाने सांगितले आहे.

सध्या प्रियंका देखील वर्क फ्रॉम करत आहे. वर्क फ्रॉम कंसेप्ट तिला खूप आवडली असून यामुळे सगळ्या गोष्टी करणे सहज शक्य झाले आहे. गर्दीपासून दूर राहणे  शक्य होते. तसेच घरी बसूनही काम होत असल्यामुळे रोजचे ते ट्रॅफिक आणि त्या मीटिंग्स मी घरीच बसून करत असल्याचे तिने म्हटले आहे.

प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच तिचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' प्रकाशित केलंय. सिने विश्वात वेगळी ओळख निर्माण करण्यात तिने जराही कसर सोडली नाही. आता तिचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय. प्रियांका चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचं पुस्तक बेस्ट सेलर ठरल्याची माहिती दिली आहे. यूएसच्या टॉप १० बुक्सने लिहिले आहे की, गेल्या २४ तासात यूएसमध्ये बेस्ट सेलर्समध्ये नंबर १ प्रियांका चोप्रा जोनसचं पुस्तक अनफिनिश्ड आहे. 

याबाबत प्रियांकाने सर्वांचे आभार मानत लिहिले की, 'त्या सर्वांचे आभार ज्यांनी यूएसमध्ये गेल्या २४ तासात माझ्या पुस्तकाला नंबर १ वर पोहोचवलं. आशा आहे की, तुम्हाला पुस्तक आवडलं असेल'. प्रियांकाने या पुस्तकात तिच्या जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टी लिहिल्या आहेत.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास