Join us

म्हणे, प्रियांका व निकचे लग्न ‘फसवे’! मॅगझिनवर संतापले कुटुंबीय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 10:04 IST

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न आटोपले. दिल्लीतील रिसेप्शनही थाटामाटात पार पडले. पण यादरम्यान एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय,‘द कट’ नामक एका इंटरनॅशनल मॅगझिनने प्रियांकाला global scam artist संबोधले आहे.

ठळक मुद्देहोय, निकने हे लग्न आपल्या इच्छेविरूद्ध केले, असा दावा या लेखात करण्यात आला केला. ‘ प्रियांका व निक यांच्यात खरे प्रेम आहे काय?’ असे या लेखाचे शीर्षक आहे.  मारिया स्मिथ नामक पत्रकाराने हा लेख लिहिला आहे.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न आटोपले. दिल्लीतील रिसेप्शनही थाटामाटात पार पडले. पण यादरम्यान एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय,‘द कट’ नामक एका इंटरनॅशनल मॅगझिनने प्रियांकाला global scam artist संबोधले आहे. या मॅगझिनमध्ये प्रियांका व निकच्या लग्ना्नच्या पार्श्वभूमीवर एक लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात या मॅगझिनने काही धक्कादायक दावे केले आहेत. होय, निकने हे लग्न आपल्या इच्छेविरूद्ध केले, असा दावा या लेखात करण्यात आला केला.

‘ प्रियांका व निक यांच्यात खरे प्रेम आहे काय?’ असे या लेखाचे शीर्षक आहे.  मारिया स्मिथ नामक पत्रकाराने हा लेख लिहिला आहे. या लेखात प्रियांका व निक यांचे लग्न  ‘फसवे’,‘खोटे’ असल्याचे म्हटले आहे. १००० शब्दांच्या या लेखात निकयांकाचे रिलेशन खोटे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही, तू हा लेख वाचला असतील तर लवकरात लवकर स्वत:ला यातून बाहेर काढ,असा सल्ला निकला देण्यात आला आहे.हा लेख प्रकाशित झाला आणि सगळीकडे खळबळ माजली. निक व प्रियांका दोघांचेही कुटुंब या लेखामुळे संतापले. निकचा मोठा भाऊ जो जोनास याने या लेखाची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.

हे लज्जास्पद आहे. इतक्या अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याबद्दल ‘द कट’ला लाज वाटायला हवी. प्रियांका व निक यांच्यात जे काही आहे, त्याला सुंदर प्रेम म्हणतात, असे जो जोनासने लिहिले आहे.जो जोनासची होणारी पत्नी आणि प्रियांकाची होणारी जाऊ सोफी टर्नर हिनेही या लेखाची निंदा केली आहे.

हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. ‘द कट’ने अशा लज्जास्पद गोष्टी लिहिण्यासाठी आपले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, हे पाहून मी निराश आहे, असे तिने लिहिले आहे.बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनीही ‘द कट’मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखाची निंदा केली आहे.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास