Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट ; चाहते संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 17:46 IST

एका नजरेतच चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती कशी तर, तिने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समजतेय.

मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव्ह’ चित्रपटातून अभिनेत्री प्रिया वारिअर अचानक प्रकाशझोतात आली. तिचे लूक्स, तिचे व्हिडीओ, फोटोंमुळे मध्यंतरी ती प्रचंड चर्चेत आली होती. तिच्या एका नजरेतच चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती कशी तर, तिने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समजतेय. पण, तिने हे का केले? हे चाहत्यांना समजत नाहीये. सध्या सर्व चाहते संभ्रमात पडल्याचे कळतेय.

प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन राहिलेलं नाही. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील एका व्हिडीओमुळे प्रिया रातोरात प्रकाशझोतात आली. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. प्रियाने नुकतंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केल्याचं सांगण्यात येत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडेच प्रियाने ट्रोलिंगकडे आणि नकारात्मक चर्चा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसातच तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केलं आहे. त्यामुळे प्रियाने अचानकपणे हा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे या वेळात कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी प्रिया सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्याचा निर्णय घेतला. प्रिया नॅशनल क्रश असून तिचे सोशल मीडियावर अफाट चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. दरम्यान, इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्यापूर्वी तिने मल्याळम भाषेत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रियाने आतापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :प्रिया वारियरइन्स्टाग्राम