Join us

इतकी लोकप्रियता असूनही प्रियावर आली ही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 10:37 IST

आजही तिचा एखादा व्हिडीओ आला तरी प्रेक्षकांच्या उड्या पडतात. प्रियाची लोकप्रियता पाहता तिच्याकडे खूपसारं काम असेल असं सर्वांना वाटत असेल. 

मुंबई : आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असते. आजही तिचा एखादा व्हिडीओ आला तरी प्रेक्षकांच्या उड्या पडतात. प्रियाची लोकप्रियता पाहता तिच्याकडे खूपसारं काम असेल असं सर्वांना वाटत असेल. 

प्रियाची अफाट लोकप्रियता असूनही कामाच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. सध्या प्रियाकडे कोणतही काम नाहीये. याचा खुलासा स्वत: प्रियाने केलाय. प्रियाने 'ओरु अदार लव्ह' मधील अभिनेता रोशन अब्दुल राउफसोबत फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत तिने तिच्याकडे काम नसल्याचं सांगिलतंय. 

दरम्यान, प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करु शकते. तसेच याआधीच प्रियाचं रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या सिंबासोबत जोडलं गेलं होतं. पण नंतर यावर काहीही माहिती समोर आली नाही.

टॅग्स :प्रिया वारियर