Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिवळ्या रंगाच्या नववारी साडीत प्रिया मराठेचा दिसला मराठमोळा अंदाज, म्हणाली- 'मी.. अशी ही..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:39 IST

Priya Marathe looks beautiful in saree : नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.

अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच प्रियाने मराठमोळ्या अंदाजातील तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया पिवळ्या रंगाची नऊवारी साडीत नेसली दिसते.  'मी.. अशी ही..'  असे कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. साडीत प्रियाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. प्रियाचा हा फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी ती दर्शवली आहे. प्रियाच्या एका चाहत्याने ताई आमचा मान सन्मान अशी कमेंट केली आहे. 

तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

टॅग्स :प्रिया मराठे