Priya Bapat Special Post For Sai Tamhankar: फिल्मी जगतात स्पर्धेमुळे अभिनेत्रींमधील मैत्रीतही दुरावा येतो. वाद विकोपालाही जातात. पण, काही अशाही अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या मैत्रिणीला पुढे जाताना पाहून तिचं कौतुक करण्यात कधीच मागे राहत नाहीत. यापैकी एक लोकप्रिय जाडी आहे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेत्री सई ताम्हणकर. या दोघी एकमेकींच्या गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रिणी आहेत. सई आणि प्रिया या सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या दोघींनीही फक्त मराठीतच नाही हिंदीतदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आशातच आता या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
नुकतंच सईची 'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित चित्रपटातील 'आलेच मी' या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर आली आहे. आपल्या लाडक्या मैत्रिणीचा डान्स पासून प्रिया खूश झाल्याचं पाहायला मिळालं. प्रियानं सईच्या लावणीचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. यासोबत तिनं कॅप्शनमध्ये "एss चिकनी!" असं म्हणतं सईचं कौतुक केलं आहे.
सई आणि प्रिया यांची मैत्री ही खूप खास आहे. या दोन्ही अभिनेत्री एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दोघींचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रिया आणि सई एकमेकींचं कौतुक करताना थकत नाही. त्यांच्यातील ही गोड मैत्री अनेकांसाठी आदर्श आहेत. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी 'वजनदार' आणि 'टाइम प्लीज' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. या दोन्ही सिनेमात सई-प्रियाचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सई आणि प्रिया पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार या प्रतीक्षेत त्यांचे फॅन्स आहेत.