Join us

'ही' मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 06:30 IST

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. आम्ही बोलतोय अभिनेत्री प्रिया बापटबाबत.

प्रियाने  काही  दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती फोटो काढताना दिसतेय. या फोटोच्या माध्यमातून प्रियाने सगळ्या फोटोग्राफर्सना वर्ल्ड फोटोग्राफीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. 

टॅग्स :प्रिया बापट