Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:20 IST

प्रिया बापट आणि सुरवीन चावलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) गेल्या काही काळापासून हिंदीत जास्त सक्रिय आहे. अनेक हिंदी वेब सीरिज, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. इतकंच नाही तर तिने आपल्या भूमिका गाजवल्याही आहेत. नुकतीच तिची 'अंधेरा'ही हॉरर वेब सीरिज रिलीज झाली आहे. यात ती पोलिस अधिकारी आहे. तिच्यासोबत सुरवीन चावला आणि प्राजक्ता कोळीही मुख्य भूमिकेत आहेत.  दरम्यान प्रियाने आणि सुरवीन चावलाने सीरिजमध्ये लिपलॉक सीन दिला आहे जो आता व्हायरल होतोय.

प्रिया बापटची 'अंधेरा'सीरिज अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातच एक म्हणजे सुरवीन चावलासोबतचा तिचा लिपलॉक सीन. याआधी प्रियाने 'सिटी ऑफ ड्रीम्स' सीरिजमध्येही पहिल्यांदाच लेस्बियन इंटिमेट सीन केला होता. तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता तिने 'अंधेरा'सीरिजमध्ये अभिनेत्री सुरवीन चावलासोबत इंटिमेट सीन केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

२०१९ साली 'सिटी ऑफ ड्रीम्स' सीरिज रिलीज झाली होती. त्यात पहिल्याच सीझनमध्ये प्रियाने लेस्बियन किसींग सीन दिला होता. पहिल्यांदाच प्रियाला अशा भूमिकेत पाहिल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. यावर ती म्हणालेली की, "संपूर्ण सीरिजमध्ये तो सीन काही मिनिटांचा आहे. तसंच त्या सीनची गरज होती कारण त्याचा संदर्भ संपूर्ण सीरिजमध्ये लागतो. एका सीनवरुन माणसाला जज करु नका."

टॅग्स :प्रिया बापटसुरवीन चावलावेबसीरिजव्हायरल व्हिडिओट्रोल