Join us

मेगन मार्केल व प्रिन्स हॅरी बनणार आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 20:08 IST

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल लवकरच आई-बाबा बनणार आहेत.  होय, आज केसिंग्टन पॅलेसने ही गोड बातमी शेअर केली. 

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल लवकरच आई-बाबा बनणार आहेत.  होय, आज केसिंग्टन पॅलेसने ही गोड बातमी शेअर केली. प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल सोमवारी आॅस्ट्रेलिया दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान ही गोड बातमी शेअर करण्यात आली. 

गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल  घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला होता. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचे असून मेगन ३६ वर्षांची आहे.  

टॅग्स :प्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाह