Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prem Chopra Birthday Special : हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे प्रेम चोप्रा यांचा जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:44 IST

प्रेम चोप्रा यांचे दोन जावई अभिनेते असून एका जावयाने तर आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ठळक मुद्देप्रेम चोप्रा यांची मुलगी पुनिताने अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केले असून विकास हा प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक देखील आहे तर प्रेरणा या त्यांच्या मुलीने प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशीसोबत लग्न केले आहे.

शेकडो चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांचा आज म्हणजेच 23 सप्टेंबरला  वाढदिवस आहे. आज प्रेम चोप्रा बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत. पण 80 च्या दशकातील अनेक चित्रपटात त्यांची भूमिका ही ठरलेली असायची. 23 सप्टेंबर 1935 रोजी प्रेम चोप्रा यांचा जन्म झाला. आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रेम चोप्रा यांनी 300 हून अनेक चित्रपटांत काम केले. त्यांनी सगळ्याच चित्रपटांमध्ये साकारलेला खलनायक प्रेक्षकांना भावला.

प्रेम चोप्रा यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमध्ये वाचायला मिळते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कुटुंबियांविषयी सांगणार आहोत. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असून त्या राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या लहान बहीण आहेत. प्रेम आणि उमा यांना प्रेरणा, पुनिता, आणि रतिका नंदा अशा तीन मुली आहेत. रतिका ही लेखिका असून प्रेम नाम है मेरा हे त्यांच्या आयुष्यावर तिने पुस्तक लिहिले होते. 

प्रेम चोप्रा यांची मुलगी पुनिताने अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केले असून विकास हा प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक देखील आहे तर प्रेम चोप्रा यांची मुलगी रतिका ही पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा यांची मुलगी आहे तर प्रेरणा या त्यांच्या मुलीने प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशीसोबत लग्न केले आहे.

शर्मनला त्याची पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळते. प्रेरणा आणि शर्मन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. काहीच दिवसांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरं तर लग्नाच्या आधी कित्येक महिने ते दोघे नात्यात होते. पण त्या दोघांमध्ये कोणीच कोणाला प्रपोज केले नाही असे शर्मनने एका मुलाखतीत सांगितले होते. 15 जून 2000 ला त्या दोघांचे मुंबईत धुमधडाक्यात लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत.  

टॅग्स :प्रेम चोपडाशरमन जोशी