Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील ममताने साजरा केला तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:57 IST

'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे आपल्याला पाहायला मिळते आहे.

सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची';प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते आहे. या मालिकेतील ममता ही जेवणाचे डब्बे बनविण्याचा व्यवसाय स्वबळावर करते आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा केला. त्यांनी ‘द ट्रान्स कॅफे’, वर्सोवा येथील आणि 'ट्विट फाउंडेशन', गोरेगाव येथील तृतीयपंथी कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधला आणि उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. या प्रसंगी, मालिकेतील तृतीयपंथी आई ची भूमिका साकारत असलेली 'ममता' आणि तिची मुलगी 'दिशा' आणि 'शन्नोबी' (ममताची मैत्रीण) यांनी निष्ठा निशांतशी प्रभावी चर्चा केली.

दिशाने व्यक्त केले की, तिच्या तृतीयपंथी आईसोबतच्या या अनोख्या बंधाने आई-मुलीच्या नातेसंबंधाला एक संपूर्ण नवीन दृष्टीकोन दिला आहे आणि आईची खरी व्याख्या काय आहे हे तिला समजले. ममताच्या अस्तित्वासाठी दिशाची चाललेली धडपड मालिकेतून पाहायला मिळतेच आहे. याव्यतिरिक्त, शन्नो बी यांनी व्यक्त केले की, ममतासारख्या लोकांना ते कोण आहेत, हे स्वीकारताना सन्मानाने जीवन जगण्यासाठी कुटुंब, मित्र आणि समाज यांच्याकडून आधार मिळणे आवश्यक आहे.

प्रतिशोध झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी, सन्मानाने उपजीविकेसाठी प्रयत्न करणाऱ्या, तृतीयपंथींबरोबर 'मदर्स डे' साजरा केला. ट्रान्स कॅफे आणि निष्ठा निशांत यांची ममतासोबत झालेली भेट ही ममताला प्रेरणा देऊन गेली त्यांच्याकडून नक्कीच काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या कार्यातून ममताला देखील तिच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत नक्कीच होईल असा विश्वास सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर यांनी व्यक्त केला. 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', ही मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. 

टॅग्स :सोनी मराठी